Blog Details

मिरची संपूर्ण व्यवस्थापन

मिरची संपूर्ण व्यवस्थापन   

जमीन आणि हवामान : मध्यम ते काळी आणि पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन मिरची पिकास योग्य असते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात खत घातल्यास चांगले पीक येऊ शकते. साधारणपणे 75 सें.मी. पाऊसमान असलेल्या भागात ओल धरून ठेवणार्‍या काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू मिरचीचे पीक चांगले येऊ शकते. जमिनीची नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

जमिनीची मशागत

शेतातील पूर्व हंगामातील पिकांचे रोगग्रस्त काडी कचरा वेचून शेता बाहेर टाकावा

शेताची उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी.

पिक लागवडीसाठी बेड तयार करताना बेडची दिशा ही वाऱ्याच्या दिशेला लंबाकार येऊन वारा वाहण्यास अडचणीचे ठरेल अश्या प्रकारे बेड तयार करू नये. म्हणजेच उत्तर दक्षिण बेड पाडावे

मिरची लागवड करतांना योग्य वयाच्या रोपाची लागवड करणे. (३५-४० दिवस)

      घरच्या घरी रोप तयार करतांना शक्य झाल्यास मोठ्या आकाराच्या ट्रे १०२ नंबरचा असावा व तसेच नर्सरी मधून रोप घेतांना रोप हे 35 ते 40 दिवसाचे निरोगी रोपाची निवड करावी .

 जेणे करून मुळे वाकडी होणार नाही.

 दोन बेड मधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे व दोन रोपातील अंतर हे 1.5 ते 2 फुट ठेऊन लागवड करावी॰

मिरची लागवडीचा कालावधी

 मिरची हे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतात. खरीप हंगामामध्ये मिरचीची लागवड मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत करतात. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये मिरचीची लागवड करतात

 मिरची जाती  

पोपटी जाती कमी तिखट  –रासी- सोनल / अंकुर-930  / nongwoo – NW 7711 / JEWELRY / नामदेव उमाजी – ओमेगा / SEMINIS-सितारा गोल्ड  GOLDEN SEED -सुपर महाज्वाला / कलश – दिशा

गर्द हिरवी जास्त तिखट –ADVENTA- AK 47 /  महिको – तेजा 4 / राशी – प्राइड 151 / NETHRA – ASTON - ANUSHAKA /  महिको – VANTEJ / JK -ISHWARI  / SYNGENTA- 5531 / BAYAR – LASER / पंचा गंगा -650 / कलश -ALBELI 1483 -  सोम 1481 /

लाल विक्री साठी

-  SEMINIS- वंडर हॉट  / BASF – आरमर / इंडो बीज - विंडम-5  / SYNGENTA- 1048 / बाहुबली

बेड तयार करते वेळी बेसलडोज हा बेडमध्येच भरून द्यावा

* मिरचीला मुख्य अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी*

( *सिंगल सुपर फॉस्फेट २ बॅग १०:२६:२६ २ बॅग  किंवा * डी.ए.पी. २ बॅग + पोटॅश १ बॅग )

* तसेच इतर महत्वाचे अन्नद्रव्य *

सल्फाबूस्ट 2 किलो + रायझर-जी १५ किलो किंवा + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + लिंबोळी पेंट २०० किलो + कारटॉप हायडक्लोराईड ५ किलो ( जमिनीतील उपद्रवी किडींच्या नियंत्रणासाठी  )

* मिरची लागवडीत घावयाची काळजी *

मल्चिर्ंग पेपर हा २५ ते ३० मायक्रॉनचा असावा.

लागवड करतेवेळी चांगले पाणी देऊन वापसा झाल्यानंतर लागवड करावी,

शक्य झाल्यास रोपे लागवड करण्याअगोदर रोपाची प्रक्रिया करून रोप लागवड करावी त्यात ट्रायकोबूस्ट किंवा चांगल्या गुंवतेचा ट्रायकोडर्मा 1 लीटर पाण्यात 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा  +  2 मिलि रिहांश या प्रमाणात प्रक्रिया करावी किंवा लागवड झाल्या बरोबर याच प्रमाणात आळवणी करावी

लागवड करतांना रोपाची मुळे वकणार नाही याची काळजी घ्यावी

सर्वात महत्वाचे लागवड झाल्याबरोबर जर तुम्ही मिरची मल्चिर्ंग पेपर लागवड केलेली असेल तर त्यात कागदी कप टाकावे जेणे करून मिरचीची रोपे जळणार नाही .

लागवडी नंतर बेड वर मिरची रोप पिवळे पडणे, फळांची संख्या कमी होणे, फुलगळ वाढणे आदिसमस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी पुढील वेळापत्रकाचा वापर करावा.

 

*काही महत्वाच्या आळवण्या *

1 )  रोपे रिहांश व  ट्रायकोबूस्ट मध्ये बुडवून न लावल्यास लागवड होतात याची आळवणी करावी.

 ट्रायकोबूस्ट 2 किलो + रिहांश 500 मिलि  प्रती 200 लीटर साठी प्रमाण

2 ) लागवडीनंतर रोपे मरु नयेत ,पिवळेपडू नयेत मुळकुज होऊ नये

म्हणून यासाठी लागवडी नंतर 5 दिवसांनी रायझर 2 लीटर + पिक्सल ५०० मिली / रिडोमिल गोल्ड ५०० ग्रॅम एलीयेट ५०० ग्रॅम प्रती 200 लीटर साठी प्रमाण एका एकर मध्ये  आळवणी करावी .

3 लागवडी नंतर साधारणतः10 दिवसांनी 200 लीटर  पाण्यात एक किलो चांगल्या गुणवत्तेचे PSB

( P – BOOST ) + चांगल्या गुणवत्तेचे KMB ( K -LIFT ) व उत्तम मायकोरायझा जसे मायकोस्टार 100 ग्रॅम प्रती एकर द्यावे

लागवडीपासून ते तोडा सुरु होण्यापूर्वी पर्यंतचे शेड्युल

१५ ते ३० दिवसामध्ये परिस १९:१९:१९ - ५ किलो ३ वेळा

३० ते ४५ दिवसामध्ये परिस १२:६१:०० - ५ किलो ३ वेळा

+ ( जास्तीत जास्त फुटाव्या साठी एक वेळा टॉपअप  1 लीटर द्यावे )   

४५ ते ६० दिवसामध्ये परिस १३ :४०:१३ - ५ किलो ३ वेळा

प्रती एकर प्रमाण 

 

*प्रत्येक तोडा झाल्यानंतर*

पहिले वेळा परिस  १२:६१:००  - ५ किलो एक वेळा

दुसरी वेळी परिस  १३:००:४५  -  ५ किलो एक वेळा

तिसरी वेळी बिग बी  ५ -   किलो एक वेळा

प्रती एकर प्रमाण 

 

*मिरचीचा तोडा सुरु झाल्यापासून दर महिन्यात द्यावयाची खते*

~ म्यॅगनेशियम सल्फेट ५ किलो + सल्फाबूस्ट १ किलो

~  कॅल्शियम नायट्रेड ५ किलो + बूस्टबोर 500  किलो

~ फेरस EDTA ५०० ग्रॅम + झिंक  EDTA ५०० ग्रॅम

~ परिस स्पर्श ५०० ग्रॅम              - कार्य सांगणे

~ अँटी ऑक्स  २५० मिली     - कार्य सांगणे

~ शक्यतो रायझर 2 लीटर व मायकोस्टार 100 ग्रॅम प्रती एकर आलटून पालटून महिन्यात एक वेळा द्यावे

अँटी-ऑक्सचे कार्य

 अँटी-ऑक्स एक १००% ऑरग्रॅनिक प्रॉडक्ट आहे. यामध्ये अँटी ऑक्सिडंट आहे. तो

पिकावर कार्य कसे करते. कुठल्याही वनस्पती वा सजीवामध्ये पेशी असतात व त्या पेशीमध्ये मायट्रोकॉन्टरिया असते. मायट्रोकॉन्टरिया हे पेशीला ताकत देते, मायट´ोकॉन्टरियाची जर झीज झाली तर कुठलेही पिक वार्धक्याकडे (म्हातारपणा) कडे जाते, अँटी-ऑक्स (अँटी ऑक्सिडंट) हे मायट्रोकॉन्टरिया चार्ज करते. त्यामुळे पिकामध्ये एक नव चैतन्य व तारुण्यपण टिकून ठेवते व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होते.

कीड व रोग व्यवस्थापन

मिरचीवरील कीड

    मिरची या पिकावर रस शोषण करणारी कीड जास्त प्रमाणात आढळते. त्यापैकि  फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी तसेच कोळी व मावा या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो.

1 मावा 2 तुडतुडे 3 फुलकिडा 4 पांढरी माशी 5 कोळी 6 मिजमाशी ओळख सांगणे

त्यातील काही महत्वाच्या किडींसाठी लागणारे कीटकनाशके

1  )  फुलकिडा ( थिप्स ) मिजमिशी  – रेज / अलिका -10 मिलि / रिहांश 20 मिलि / रिंगा 50-/कराटे –20 मिलि / मेट्याडोर 30 मिलि / लिसेंटा 4 ग्रॅम / रोगोबूस्ट / रोगर 30 मिलि / जम्प 4 ग्रॅम

2 ) कोळी ( माइट्स ) ओमाइट 30 मिलि / बोर्निओ 10 मिलि / अब्रेज 40 मिलि / मायजिस्टर 15 मिलि / आबासीन 15 मिलि / मेटिगेट 15 मिलि इत्यादि आलटून पालटून घ्यावे

3 ) पांढरी माशी ( व्हाइट फ्लाय ) अमेट /टाटा माणिक -10 ग्रॅम / लॅनो 40 मिलि / पेगसास 15 ग्रॅम / मार्कर -30 मिलि / SLR 525 -40 मिलि इत्यादि

मिरचीवरील रोग

 मिरची या पिकामध्ये प्रामुख्याने मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणू जन्य पानावरील ठिपके, कोइनोफोरा करपा, भुरी रोग व विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगांपसून पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय योजना केल्यास प्रभावी नियंत्रण मिळू शकते ,

कोणत्याही बुरशी जळण्यासाठी पहिले स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरुन नंतर अंतर प्रवाही बुरशीनाशकाचा वापर करावा जेणे करून उत्तम नियंत्रण मिळेल

स्पर्शजन्य बुरशीनाशके : - 

व्हीम सुपर 30 ग्रॅम / M -45 -30 ग्रॅम / Z -78 – 30 ग्रॅम कॅप टॉप ३० ग्रॅम / कुमान l  - ४० मिली / सल्फा बूस्ट २० ग्रॅम या पैकी एक आलटून पालटून बुरशीनाशकाचा वापर करावा

स्पर्शजन्य बुरशीनाशके वापरुन आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करावा

आंतरप्रवाही बुरशीनाशके : - 

सुखई ३० मिली / कॅब्रिओटॉप ४० ग्रॅम / अमिस्टार टॉप १५ मिली / फोलीओगोल्ड २० मिली / मेलिओडीओ ४० ग्रॅम / सेकॅंटीन २० ग्रॅम / नेटिओ १० ग्रॅम /कस्टोडिया २० मिली / लुना एक्स्पीरियंस १५ मिली / इंडेक्स २० ग्रॅम या पैकी एक आलटून पालटून बुरशीनाशकाचा वापर करावा

 

मिरची फवारणी व्यवस्थापन

~ रेज  १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + व्हिमसुपर ३० ग्रॅम 

~ डीझायर – ३० मिली + टॉपअप ४० मिली + पिक्सल ३० ग्रॅम

~ इमान १० ग्रॅम + झेप १० मिली + सुखई  ३० मिली

~ पटियाला पॅक  ४० मिली + रायबा  ५ मिली + प्रोपीकोनाझोल – १५ मिलि

~ ETN-सुपर ३० मिली + भरारी ७ मिली + स्कोर १० मिली +कवच ३० ग्रॅम

~ SLR ५२५ - ४० मिली + अँटीऑक्स ७ मिली + नेटीओ १० ग्रॅम    

# जास्त प्रमाणत थ्रिप्स असल्यास ट्रेसर  ७ मिली किंवा डेलिगेट १८ मिली

#  जास्त प्रमाणत माईट्स  असल्यास म्यजिस्टर १५ मिली किंवा मेटीगेट  १५ मिली

प्रती पंपाला प्रमाण

१ निमॅटोड ( सूत्रकृमी ) च्या नियंत्रणासाठी :-  निपीड 1 किलो / प्यासिलो मियसिस 1 लीटर / ट्रायको हर्जेंनियम 1 लीटर / नेम्यटिड 100 ग्रॅम प्रती एकर प्रमाण दर अमावशाला सोडावे  

२ येल्लो स्टिक लावा ब्ल्यू स्टिक लावा

३ लाईट ट्रब  आणि  फेरोमोन ट्रब लावा

४ इकोनिम १००००ppm अधून मधून वापर करावा

५ अधून मधून सुडोमोनस , बॅसिलस , ट्रायकोडर्मा , PSB , KMB , हे जिवाणू रोग व कीड विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सोडा

पिकांच्या लागवड काळात वातावरणातील फेरबदलानुसार पिक संगोपनात योग्य तो बदल करण्यासाठी कृपया आमच्या  प्रतिनिधीशी संपर्क साधावा..

आमचा शेतकरी सहयता क्रमांक 8888167888

धन्यवाद .......