Blog Details

सुधारित तंत्रज्ञानाने वाढवा हरभरा पिकाचे उत्पादन

जगातील एकून हरबऱ्याच्या पिकापैकी ७५% पीक भारतात घेतले जाते. भारतामध्ये हे पीक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रत प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हरबऱ्याचे दाणे पक्व होण्यापूर्वी कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात तसेच कोवळे शेंडे भाजी म्हणून वापरतात. हरभऱ्याच्या मुळावरील गाठींमुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण वाढते. हरभऱ्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे घोडे व इतर जनावरांना खुराक म्हणून हरभरा दिला जातो. टरफलासह दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १९ % असून नुसत्या डाळीत २२ ते २५% असते. हरभऱ्याच्या कोवळ्या पानात मलिक व ऑक्झॉलिक आम्ल असते. हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल, तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक्षम सुधारीत वाणांचा वापर, योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर, पाणी आणि पीकसंरक्षणाचे योग्य नियोजन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, वेळीच आंतरमशागत या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दृष्टीने हरभरा पीक लागवड़ सुधारीत पद्धतीने करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारीत वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.

  • उत्पादन वाढीचे काही ठळक मुद्दे:

  • हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने खालील बाबींचे अवलंबन करणे गरजेचे आहे. 

  • अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर.

  • योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत

  • वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर 

  • बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर

  • तणनियंत्रण

  • पाण्याचे योग्य नियोजन

  • रोग आणि किर्डीपासून पिकाचे संरक्षण > तुषार सिंचनाचा वापर व योग्य पाणी व्यवस्थापन

  •  जमीन व हवामान: मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक ७०० ते १००० मि.मि. पर्जन्यमान असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपन अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये हरभन्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. साधारणतः ५.५ ते ८.६ सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.

  • पूर्व मशागत: खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ से.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने. जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याचे अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

  • पेरणीची वेळ: जिरायत हरभन्याची पेर जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा १० ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१० सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याच्या पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ से.मी.) हरभरा पेरणी  केली तरी चालते.

  • सुधारित वाणांची निवड: 

विजय: अथिक उत्पादन  क्षमता, मर रोगास प्रतिकारक, जिरायत तसेच बागायती साठी उपयुक्त. बागायती मध्ये १०५ ते ११० दिवसात परिपक्व होणारे वाण. बागायती मध्ये सरासरी उत्पादन २०-२५ क्विं./ हे.

दिग्विजय: बागायती व जिरायती साठी उपयुक्त, जिरायती मध्ये ९०-९५ दिवसात परिपक्व होणारे तसेच १०५-११० दिवसमध्ये परिपक्व होणारे. योग्य व्यवस्थापन व बागायती क्षेत्रामध्ये सरासरी उत्पादन २३-२५ क्विं./ हे

फुले विक्रांत: मर रोगास प्रतिकारक, बागायती लागवडीसाठी, सरासरी उत्पादन २०-२१ क्वि.हे.

फुले विक्रम: उंच वाढणारे तसेच (मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी उपयुक्त)

विराट : काबली वाण, अधिक टपोरे दाणे तसेच मर रोगास प्रतिकारक. सरासरी उत्पादन १९ क्वि./हे. तसेच कालावधी ११०-११५ दिवस.

कृपा : काबुली वाण, १०५ ते ११० दिवसात परिपक्व होणारे वाण. सरासरी उत्पादन १८ क्वि./हे. दाणे सफेद पांढरया रंगाचे टपोरे, त्यामुळे सर्वाधिक बाजारभाव मिळणारे वाण.

विशाल :आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादन क्षमता व मर रोगास प्रतिकारक आणि अधिक बाजारभाव मिळणारे वाण. ११०-११५ दिवसात परिपक्व होणारे व सरासरी २३ क्वि./हे. उत्पादन देणारे वाण.

जाकी ९२१८ : हा देशी हरभऱ्याचा टपोरया दाण्याचा वाण आहे. लवकर परिपक्व होणारा (१०५ ते ११० दिवस) तसेच मररोगास प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रतिहेक्टर एवढे आहे. हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त असून विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. 

श्वेता (आय.सी.सी.व्ही.-२) : मर रोगास प्रतिकारक्षम आहे. दाणे टपोरे असून, जिरायतीमध्ये ८५ ते ९० दिवसात तर ओलिताखाली १०० ते १०५ दिवसांत पक्व होतो. जिरायतीमध्ये ८ ते १०, तर ओलिताखाली २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.

  • पीकेव्ही काबली-२ : मर रोग प्रतिकारक्षम. पेरणीस उशीर व पाण्याचा ताण पडल्यास टपोरेपणावर परिणाम होतो. म्हणून या वाणाची लागवड योग्यवेळी ओलिताखाली करावी. ओलिताखाली उत्पादन १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टर मिळते.

  • पीकेव्ही काबुली- ४ : या वाणाच्या दाण्याचा आकार अतीटपोर आहे. मर रोगास साधारण प्रतिकारक्षम. या वाणाचे सरासरी उत्पादन १५ क्विंटल एवढे मिळत 

  • गुलाबी हरभरा: गुलक- १ : टपोऱ्या दाण्याचा वाण. मुळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक असून, दाणे चांगले टपोरे, गोल व गुळगुळीत असतात. - हिरवा हरभरा दाण्याचा रंग वाळल्यानंतरसदधा हिरवा राहतो. उसळ. पलाव करण्यास उत्कष्ट.

  • पीकेव्ही हरिता : हा वाण औलिताखाली लागवडीसाठी योग्य. मर रोगास प्रतिकारक. उत्पादन सरासरी २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्टर आहे.

  • इतर वाण- साकी-९५१६, चाफा-२१६, बिडीएनजी-७९७, फुले-जी-५, फुले-राजस,

  • बीजप्रक्रिया आणि जिवाणसंवर्धन : बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि शीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम+२ ग्रॅम कार्बेन्डॅझीम एकत्र करून प्रति किलो बियाणांस चोळावे. यानंतर १० किलो बियाण्यास रायोबियम जीवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभऱ्याच्या मळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढन हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ते ५ टक्के उत्पादन वाढते.

  • बियाणे प्रमाण : हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाणाचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्यांच्या वाणाकरीता६५ ते ७० किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरीता १०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी.के.व्ही. ४ या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरीता १२५-१३० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. ९० सें.मी. रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबली वाणासाठी जमीन ओली करून वाफशावर पेरणी केली असता रुजावा चांगला होतो.

  • खत व्यस्थापन : प्रति हेक्टरी चांगले कजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी.) अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे. पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

  • आंतरमशागत : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३०-४५ दिवसात शेण तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामळे एकण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवानाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते, दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. मजरा अभावी खरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथिलिन (स्टॉम्प) या तणनाशकांची २.५ ते ३ लिटर प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

  • पाणी व्यवस्थापन : जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा कूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्याकरिता ३०-३५ दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात त्याकरिता ३०-३५ दिवसांनी पहिले व ६०-६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सें.मी. पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ सें.मी.) देणे महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक-उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.

  • तुषार सिंचनाचा वापर हरबऱ्यासाठी योगदान : हे पीक पाण्यात अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पदधतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मळकुजासारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.

  • आंतरपीक : हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रबी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजंस किवा वरंब्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभऱ्याचा बेवड ऊसाला उपयुक्त ठरून ऊसाच्या उत्पादनात वाढ होते.

  • एकात्मिक कीड व्यवस्थापन (घाटे अळी नियंत्रण) : घाटे अळी ही हरभऱ्यावरील मुख्य किड आहे. घाटे अळी ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफूल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळित धान्याची पिके घ्यावीत. जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १०-१२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कीड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे फवारावीत. हरभरा पिकास फलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची (२५ किलो/हे.) पहिली फवारणी करावी. यासाठी ५ किलो निंबोळी पावडर १० लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी ९० लिटर पाणी टाकावे. असे एकूण १०० लिटर द्रावण २० गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकीले (विषाणू ग्रासीत अळ्यांचे द्रावण) ५०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, बाजारात उपलब्ध असलेल्या किटकनाशकाची फवारणी करावी.

  • पीकपक्वता /काढणी : हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात. घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी. शेताच्या सर्व भागांतील पीक वाळल्यावर पाने झडतात. पिकाची कापणी जमिनीलगत कापून केल्यास नत्राच्या गाठी असलेल्या मुळ्या जमिनीत राहून त्यातील नत्राचा पुढील पिकास उपयोग होतो.